News34 chandrapur
चंद्रपूर/विरुर - महाराष्ट्र पोलिस दलाचा आज स्थापना दिन. दि.2 जानेवारी 1961 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला यादिवशी ध्वज प्रदान केला. chandrapur police
महाराष्ट्र (Maharashtra) हे आकारमानाच्या दृष्टीने देशातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे. राज्यात 36 जिल्हे असून, महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था हाताळत आहेत ‘महाराष्ट्र पोलीस’ (Maharashtra Police). आज, 2 जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस दलाचा 59 वा वर्धापन दिन (Maharashtra Police Raising Day)आहे.
1936 मध्ये, सिंध प्रांत पोलिस हे बॉम्बे प्रांत पोलिसांमधून विभागले गेले. पुढे 1947 मध्ये, भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्याचे नाव बदलून बॉम्बे राज्य पोलिस असे ठेवले गेले. राज्य पुनर्गठन अधिनियम,1956 नंतर, मुंबई राज्य पोलिसांमध्ये विभागणी होऊन, गुजरात पोलिस, म्हैसूर पोलिस (नंतर नाव बदलून कर्नाटक पोलिस) आणि महाराष्ट्र पोलिस अशी विभागणी झाली. अखेर 2 जानेवारी 1961 साली महाराष्ट्र पोलीस दलाची अधिकृतरीत्या स्थापना झाली. maharashtra police raising day history
आज रोजी पोलीस रेझिंग डे निमित्त पोलीस स्टेशन विरुर येथे शाळेत विद्यार्थी यांची रॅली काढून लोकांना पोलीस रेझिंग डे बाबत महत्व तसा वेगवेगळ्या विषयात बॅनर वरुण जनजागृती करण्यात आली.
वीरूर पोलीस तसेशनचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांच्या नेतृत्वात विरूर गावात रॅली काढण्यात आली, रॅली मध्ये गावातील नागरिक व शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.
