News34 chandrapur
चंद्रपूर - 8 जानेवारी रविवारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचा जिल्हास्तरीय मेळावा व पत्रकारांच्या पाल्यांचा सत्कार कार्यक्रम स्थानिक ND हॉटेल मध्ये पार पडला.
यावेळी कार्यक्रमात खासदार बाळू धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार अभिजीत वंजारी, वेकोलीचे मुख्य महाप्रबंधक संजय वैरागडे, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष गजानन वाघमारे, सहसचिव राजेश डांगटे, राज्य सहसचिव अविनाश राठोड, राज्य प्रवक्ता अनंतराव गावंडे, चंद्रपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय तायडे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मजहर अली, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश सोलापन, कार्याध्यक्ष कुक्कु साहनी यांची प्रमुख उपस्थिती होती. Maharashtra gramin patrkar sangh
कार्यक्रमात पत्रकारांच्या पाल्यांचा सत्कार खासदार धानोरकर व आमदार जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आला.
मार्गदर्शन करताना आमदार जोरगेवार यांनी चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येत कार्यशाळेचे आयोजन करावे व एक चांगला समाज घडेल अश्या सकारात्मक बातम्या लिहण्याचे काम पत्रकारांनी करावे.
ग्रामीण पत्रकार हा समाजाचा कणा आहे, जे सत्य आहे त्या बातम्या प्रकाशित करण्याची ताकद सर्व पत्रकारांमध्ये आहे त्यांनी असंच नेहमी उत्तम कार्य करावे असे आवाहन केले.
खासदार बाळू धानोरकर यांनी आज प्रत्येक राजकीय व्यक्ती वर पत्रकार टीका करतात, जे खर आहे ते पत्रकारांनी लिहावे जेणेकरून आम्हाला आमच्या चूका सुद्धा समजतात, आज अनेक पत्रकार कुणाच्या तरी अधिपत्याखाली पत्रकारिता करतात, मात्र तसे न करता प्रामाणिक पत्रकारिता पत्रकारांनी करावी जेणेकरून समाजात चांगला संदेश जाणार.
पत्रकारांच्या अधिकारांवर केंद्र सरकारने गदा आणली मात्र पत्रकार त्यावर साधं लिखाण सुद्धा पत्रकार करीत नाही ही एक शोकांतिका आहे.
आज पत्रकारांची संख्या वाढत आहे, मात्र या क्षेत्रात खऱ्या पत्रकारांची संख्या कमी प्रमाणात आहे.
चुकीच्या बातम्या प्रसारित करून कुणाचीही बदनामी करण्याचं काम पत्रकारांनी करू नये जे सत्य आहे ते पत्रकारांनी बेधडक छापावे.
ग्रामीण पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष गजानन वाघमारे यांनी यावेळी ग्रामीण पत्रकारांच्या संरक्षणाचा मुद्दा उचलत, भविष्यात ग्रामीण भागातील पत्रकारांना कुणी नाहक त्रास देत असेल तर त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी राहू.
जिल्हा अध्यक्ष राजेश सोलापन यांनी उपस्थित खासदार धानोरकर, आमदार जोरगेवार व आमदार अभिजित वंजारी यांना मागणी केली की मागील अनेक वर्षांपासून ग्रामीण पत्रकार संघ हा अधिस्वीकृती समितीवर जाण्यासाठी प्रयत्न करत आहे त्यावर काही निर्णय लावावा.
सोलापन यांच्या मागणीवर आमदार जोरगेवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत सदर मागणी त्यांच्यासमोर करणार आहे, सोबतच ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष स्व. पी.एल. शिरसाट यांचा स्मृती दिन हा ग्रामीण पत्रकार संघ म्हणून शासनाने घोषित करावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष अनिल देठे, सचिव विनोद पन्नासे, कोषाध्यक्ष प्रकाश हांडे, मार्गदर्शक धर्मेश निकोसे, सहसचिव प्रभाकर आवारी, धनराज कोवे प्रसिद्धी प्रमुख, सदस्य नवजोत झाडे, अजय गणवीर, सी.आर टेंभरे, विक्की गुप्ता, अशोक गुरुवाले, विजय बोरगमवार, दुधनाथ चव्हाण आदींनी अथक परिश्रम केले.
कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील असंख्य ग्रामीण पत्रकार व तालुका अध्यक्ष अनिल स्वामी सावली, शंकर चव्हाण जिवती, मुमताज अली कोरपना, अश्फाक शेख वरोरा, लक्ष्मीकांत कामातवार सिंदेवाही, दुर्योधन धोंगडे मुल, जिवनदास गेडाम, सुरेश डांगे चिमुर कार्यक्रमात उपस्थिती होती.