News34 chandrapur
चंद्रपूर - भाजप-शिवसेना युती काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, कर्जमाफी योजना जाहीर केली होती. या योजनेत प्रारंभापासून अनेक तांत्रिक अडचणी आल्या.
त्या काळातील कर्जमाफीची रक्कम अनेक शेतकऱ्यांना आजही मिळालेली नाही. कोरपना तालुक्यातील नांदा येथिल मयत शेतकऱ्यांचे वारस मुरलीधर बोडखे, विनायक धाबेकर, कालिदास धोटे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी ही आपबिती लेखी निवेदनातून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, सहकार आयुक्त पुणे, पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार, माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांच्याकडे मांडली आहे.
त्या काळातील कर्जमाफीची रक्कम अनेक शेतकऱ्यांना आजही मिळालेली नाही. कोरपना तालुक्यातील नांदा येथिल मयत शेतकऱ्यांचे वारस मुरलीधर बोडखे, विनायक धाबेकर, कालिदास धोटे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी ही आपबिती लेखी निवेदनातून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, सहकार आयुक्त पुणे, पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार, माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांच्याकडे मांडली आहे.
कर्जमाफी प्रक्रिया राबविताना विलंब झाला. नंतरच्या काळात सरकार बदलले. या गोंधळात राज्यातील अनेक मयत शेतकरी अडचणी आल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील १५०० मयत शेतकरी यांना त्या काळातील सापडले. हे शेतकरी कर्जमाफीला पात्र असले, तरी त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमाच झाले नाही. नव्याने शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आले. मात्र, त्यांच्या कार्यकाळातील कर्जमाफीची रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. Mahatma Jyotirao Phule Debt Relief Scheme
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजना २०१९ जाहीर केली. दोन लाख रुपयांच्या कर्जमाफी योजनेत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेतील शेतकरी आले नाही. त्यांची ग्रीन यादी लागलीच नाही. तब्बल तीन वर्षे लोटली, तरी कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात पोहोचलेले नाही. याबाबतचा अहवाल सहकार विभागाने राज्य शासनाकडे पाठविला. शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करावा, यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे ॲड. वामनराव चटप यांनी सांगितले आहे. loan waiver
तसेच मय्यत शेतकरी कुटुंबातील वारसदारांना प्रमाणीकीकरण करून कर्जमाफीचा लाभ देण्याचे मान्य केले आहे. अशा प्रकरणांतील शेतकऱ्यांना विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक,नांदा फाटा संजीवनी समजोता योजेनेची नोटीस पाठवून थकीतकर्ज भरण्यास प्रवृत्त करीत आहे. या प्रकरणाची चौकशी करुन शेतकऱ्यांना जिल्हा उपनिबंधक व पालकमंत्र्यांनी दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. dead farmer
दोन्ही सरकारच्या काळातील पात्र मयत शेतकरी कर्जमाफी योजनेत कर्जमाफी मिळावी म्हणून शासन थरावर पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार हे देखील सातत्याने पाठपुरावा करीत असून मयतशेतकरी वारस कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे.