News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - मुल तालुक्यातील बेंबाळ येथील अतिशय गरीब मजूर श्री. अमोल मुरलीधर पगडपल्लीवार यांचे कौलारू घर असून घरात म्हातारे आई वडील अपंग भाऊ आणि त्याची पत्नी असा परिवार आहे. आज दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १२ वाजता टिव्हीची वायरिंग शार्ट झाल्यामुळे अचानक घराला आग लागली आणि संपूर्ण घर जळून खाक झाले.
घरात कुठलीही जीवित हानी झाली असली तरी देखील घरातील संपूर्ण संसारु उपयोगी साहित्य आणि कपडे .खाण्यासाठी खरेदी करून ठेवलेले अन्न धान्य रोज घालण्यात येणारे कपडे पूर्णतः जळून खाक झाले असून घराच्या किमती सह दोन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. घर जळून खाक झाल्याने बिचाऱ्या गरीब अमोल पगडपलीवर यांचा संपूर्ण कुटुंबच वाऱ्यावर पडला असून अशा अवस्थेत वयोवृद्ध म्हाताऱ्या आई वडील आणि अपंग असलेल्या भावाला कुठे सहारा देणार असअसा मोठा गंभीर प्रश्न अमोल समोर पडला आहे. घर जळून खाक झाल्याने निराधार झालेल्या अमोल च्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदतीची गरज आहे.
अतिशय गरीब मजूर असलेल्या अमोल पगडपल्लीवार यांची घर जळाल्याने झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि शासनाकडून निराधार झालेल्या कुटुंबाला आधार द्यावा व शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी तथा विनंती बेंबाळ येथील नव निर्वाचित सरपंच चांगदेव केमेकार यांनी केली आहे .