News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - मुल तालुक्यातील पालकमंत्री यांच्या गृह क्षेत्रात पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत एकूण सात पैकी चार ग्रामपंचायतीवर काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले असून आज पार पडलेल्या उपसरपंच निवडणुकीत पाच उपसरपंच काँग्रेसने ताब्यात घेतल्याने दोन उपसरपंच भाजपच्या ताब्यात राहिले. Congress party news
काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात अतिशय संवेदनशील असलेल्या व सर्वांचे लक्ष लागलेल्या बेंबाळ ग्राम पंचायतीने काँग्रेस प्रणित परिवर्तन पॅनल दणदणीत एकहाती सत्ता प्राप्त केली. असून उपसरपंच म्हणून देवाजी ध्यानबोइंवार यांची बहुमताने निवड केली. तर सत्ता पक्षाकडून लक्ष केंद्रित केलेल्या आकापूर् येथे मागील चाळीस वर्षांपासून संदीप कारमवार यांचे नेतृत्वात काँग्रेस प्रणित गोंडवाना आदिवासी पॅनलने सरपंचासह उपसरपंच म्हणून साहिल येंनगंटीवार, यांची स्पष्ट बहुमताने निवड करण्यात आली. यात भाजप पराभूत झाली. बाबराळा ग्रा.पं.वर सात पैकी चार जागा खेचून आणत बहुमत प्राप्त केले. उपसरपंच पदावर सौ. अनिता नाहगमकार विजयी झाले. तर तीन गावं समाविष्ट असलेल्या चक दुगाळा ग्रा.पं. मधे काँग्रेसचे चार उमेदवार बाजी मारले. उपसरपंच काँग्रेसच्या सौ लता सातपुते यांची निवड करण्यात आली. यात वंचित आघाडीला खाली पहावे लागले. गडीसूर्ला येथे भाजप प्रणित ग्राम विकास आघाडीने सरपंच निवडून आणले असले तरी उपसरपंच पदासाठी काँग्रेसच्या करिश्मा वाढई यांनी बाजी मारत माजी तालुका अध्यक्ष घनश्याम येनुरकर यांचे मार्गदर्शनात काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध झाले. उष्राळा ग्राम पंचयतीमध्ये भाजप प्रणित ग्राम विकास आघाडीने दहा पैकी आठ जागा ताब्यात घेऊन वर्चस्व प्रस्थापित केले. यात सरपंचासह उपसरपंच पदावर सौ.उज्वला तुषार ढोले यांची एकमताने निवड करण्यात आली. बोंडाला ग्राम. पं. भाजप प्रणित आघाडीने बाजी मारली असून सरपंचासह उपसरपंच पदी जगदीश बांगरे यांची अविरोध निवड करण्यात आली. काँग्रेस पक्षाकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात तसेच माजी पालकमंत्री आमदार विजय वडे्टीवार यांच्या मार्गदर्शनात लढविण्यात आल्या असून काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेस नेते सं.गा.नी. योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार, माजी तालुका अध्यक्ष व माजी सभापती घनश्याम येनुरकर,तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, युवक अध्यक्ष पवन नीलमवार, दीपक पा. वाढई, शहर अध्यक्ष सुनील शेरकी,पॅनल नियोजन प्रमुख प्रशांत उराडे, माजी सरपंच उराडेताई, राजेंद्र कन्नमवार, बंडू गुरनुले, शांताराम कामडे , सुमित पा.आरेकर, माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, गोविंदा रोहनकर,ओम चावरे,पंकज गोहने, स्वागत वणकर, प्रभाकर सोनुले, इत्यादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले तर भाजप प्रणित आघाडीचे उमेदवार विजयी करण्यासाठी पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात माजी जी.प अध्यक्ष संध्याताई गुरनुले, माजी सभापती चंदू मार्गोंनवार,माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे,प्रशांत समर्थ, यांचेसह आदी भाजप पदाधिकारी यांनी मेहनत घेतली. मुल तालुक्यात काँग्रेस प्रणित आघाडीने संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात आपले वर्चस्व सिद्ध केले.
