News34 chandrapur
चंद्रपूर/ वणी - चारही बाजूने जंगलाने वेढलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यातूनच आता मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढत आहे. Tiger attack
2 दिवसांपूर्वी कोरपना येथे 9 वर्षाच्या बालकाला बिबट्याने ठार केले, सदर घटना ताजी असताना वेकोली वणी क्षेतरील निलजई कोळसा खाणं येथे डंपर ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेले 55 वर्षीय केशव नांदे यांच्यावर वाघाने वेकोली क्षेत्रातचं हल्ला केला.
27 डिसेंम्बर सायंकाळी 6 वाजता नांदे वाहन पार्किंग जवळ उभे होते, त्यावेळी दबा धरून बसल्ल्या वाघाने नांदे यांच्यावर हल्ला केला, यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेले कामगार नांदे यांच्या मदतीला धावले असता त्यांनी वाघाला पळवून लावले. Chandrapur tiger
तात्काळ कामगारांनी नांदे यांना एम्बुलेन्स मध्ये नेत घुगूस येथील राजीव रतन रुग्णालयात दाखल केले. नांदे यांच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या आहे. Tiger in wcl
वेकोली येथे काम करणाऱ्या कामगारांमध्ये आता वाघाची दहशत पसरली असून कामावर जायचे कसे ही भीती कामगारांच्या मनात भरली आहे.