News34 chandrapur
वरोरा - शेतातील सोयाबीन चोरले म्हणून शेतातील चाकरमान्यांनी चोरांचे हात-पाय बांधत बेदम मारहाण केली, मारहानीचा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाल्याने वरोरा पोलिसांनी मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. Inhuman beating
वरोरा येथे राहणारे विनोद श्रावण देठे यांचं आष्टी वरोरा येथे 17 एकर शेती आहे, त्याठिकाणी देठे हे नोकरांमार्फत शेती करतो, शेतीचे सामान ठेवण्याकरिता शेतात बंडा बांधण्यात आलेला आहे. Viral video
28 नोव्हेंम्बरला देठे हे शेतात गेले असता तिथे सोयाबीन कमी प्रमाणात दिसले, त्यातील अंदाजे 10 क्विंटल सोयाबीन किंमत 60 हजार रुपये चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले, त्याठिकाणी संदीप रागीट व मोहन ठेंगणे हे दोघे दुचाकीवर जाताना दिसले, त्या दोघांनी शेतातील सोयाबीन चोरी केल्याचा संशय आल्यावर शेतात त्या दोघांना हात-बांधत मारहाण करण्यात आली.
त्यानंतर देठे यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली, पोलिसांनी दोघांवर 461, 380 व 34 कलम अन्वये गुन्हा दाखल केला. Chandrapur crime
गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस आष्टी येथे रवाना झाले होते, चोरीचा माल व आरोपीच्या शोधात असताना संदीप रागीट व मोहन ठेंगणे या दोघांना ताब्यात घेण्यात आले, मात्र त्या दोघांना बेदम मारहाण केली असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी स्वतः याबाबत मारहाण करणाऱ्या विरुद्ध फिर्याद नोंदविली. brutally beaten
याबाबत पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी यांनी सांगितले की ठेंगणे व रागीट हे दोघे अनेक दिवसांपासून सोयाबीनची चोरी करीत होते, एक दिवस ते दोघे हाती लागल्यावर त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली, म्हणून मारहाण करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.