News34 chandrapur
चंद्रपूर - जिल्ह्यातील अवैध धंद्यांना अंकुश घालण्याचे काम सध्या पोलिस खात्याकडून सुरू असताना राजुरा तालुक्यात अवैध सट्टापट्टी व क्रिकेट बेटिंग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. Cricket betting
Chandrapur police
सध्या राजुरा उपविभागीय पोलिस अधिकारी चा प्रभार हा सुशील कुमार नायक यांच्या कडे असल्याने त्यांनी पहिल्याच दिवशी अँक्शन मोडवर येत सट्टा पट्टी व क्रिकेट बुकी वर धाड सत्र सुरू केले. तालुक्यात सदर धाड सत्राची कुणकुण होताच अनेक दोन नंबर व्यावसायिक नायक यांची धडकी घेत भूमिगत झाले आहे. Illegal business
नायक यांच्याकडे नंबर दोन धंद्याची संपूर्ण नावासहित यादी असल्याने पाठीशी घालणाऱ्या पोलिसांनाही चुकीला माफी नसल्याचे नायक यांनी सांगितले आहे. काल स्वतः नायक यांच्या नेत्रुवात संपूर्ण पोलिस खातं दिवसभर ऍक्शन मोड वर पहायाला मिळाले सदर कारवाईत एका सट्टा पट्टी चालकाला पकडण्यात आले असून त्याचा मेन म्होरक्या प्रभू हा फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. Chandrapur crime
उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक या आधी चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत होते त्यांच्या कार्यकाळात अनेक मोठ्या कारवाया झाल्या होत्या, आजही चंद्रपूर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात त्यांचं नाव पुढे येताच अवैध धंदे व्यावसायिकांमध्ये धडकी भरते. Chandrapur news
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी व अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या नेतृत्वात सुरू आहे.