News34 chandrapur
चंद्रपूर : शहरातील जिल्हा क्रीडासंकुलात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. ही सर्व कामे शासकीय निधीतून म्हणजेच जनतेच्या पैशातून झाली आहेत. त्यामुळे या कामाचे लोकार्पण करण्याची जबाबदारी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाची आहे. त्यानुसार या कार्यालयाने प्रोटोकॉलनुसार पत्रिका छापली आहे. यानंतरही चंद्रपूर भाजप पदाधिकाऱ्यांनी या कामाच्या लोकार्पणाची स्वतंत्र पत्रिका छापली आहे. यातून भाजप पदाधिकाऱ्यांचा प्रसिद्धीसाठी केविलवाणा प्रयत्न दिसून येत असल्याची टीका चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केली आहे.
Controversial programme
पोलिस भरती व अन्य परीक्षांची तयारी करणारे युवक, युवती दररोज जिल्हा क्रीडासंकुलात येत असतात. तसेच सकाळच्या सुमारास शेकडो नागरिक मार्निंग वॉकसाठी येतात. परंतु, क्रीडासंकुलातील अनेक असुविधांचा सामना येथे येणाऱ्यांना करावा लागत होता. त्यानंतर क्रीडासंकुलातील समस्या दूर करण्याची मागणी समोर आली. राज्य शासनाने १२ कोटी १९ लाख ७७ हजार ८०० रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून ४०० मीटर स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल ग्राऊंड, मुला-मुलींकरिता चेंजिंग रूमचे बांधकाम करण्यात आले. तसेच वॉकिंग ट्रॅकसाठी ५० लाखांचा निधी नुकताच मंजूर केला आहे.
त्यामुळे या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्याची जबाबदारी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाची आहे. शासकीय प्रोटोकॉलनुसार सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करणे गरजेचे आहे. त्यानुसार क्रीडा अधिकारी कार्यालयाने पत्रिका छापली. Chandrapur district stadium

परंतु, भाजपचे पदाधिकारी क्रीडासंकुलातील कामासाठी स्वताच्या खिशातून निधी दिल्याचा आव आणत स्वतंत्र निमंत्रण पत्रिका छापून वितरित केली आहे. त्यामुळे शासकीय निधीतून करण्यात आलेल्या कामाचे लोकार्पण करण्याचा अधिकार भाजपला कुणी दिला, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. शहरातील आझाद बगीचा लोकार्पण कार्यक्रमातही असाच प्रकार भाजप पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्याचीच आता पुनरावृत्ती झाली आहे. त्यामुळे भाजप पदाधिकारी केवळ प्रसिद्धीसाठी असे प्रयत्न करीत असल्याचाही आरोप जिल्हाध्यक्ष श्री. तिवारी यांनी केला आहे.