News34 chandrapur
या काळात दारू पार्ट्यांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन होत असल्यानं यंदा ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त पहाटे पाच वाजेपर्यंत दारूची दुकानं सुरू राहणार आहेत. दारूची दुकानं पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार असल्यानं मद्यपींसाठी ही पर्वणी ठरणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे. State Excise Department
राज्यातील दारूची दुकानं यंदा 24 डिसेंबर, 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर असे तीन दिवस पहाटे पाचवाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. यंदा नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर दारूची दुकानं पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार असल्यानं मद्यपींसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. या काळात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होण्याची शक्यता असून, महसुलात देखील वाढ होणार आहे. New year 2k23