News34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही : तालुक्यातील सरडपार गावाजवळील ईटोली येथे शुक्रवार २३ डिसेंबरला सकाळी ११ वाजताचा सुमारास विद्युत तारेचा धक्का लागून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. Live electric wire
मृताचे नाव बाबुराव सुकरू शेंडे (६२ रा. ईटोली, ता. सिंदेवाही) असे आहे. बाबुराव यांच्या घरी शेळ्या असल्याने शेळ्याला चाऱ्या आणण्यासाठी घराजवळील असलेल्या चौके यांच्या शेतात गेले होते. यावेळी जिवंत विद्युत लोंबता तारेचा जोरदार धक्का लागल्याने बाबुराव यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती सिंदेवाही पोलिस स्टेशनला कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पाठविला. घटनेचा पुढील तपास सिंदेवाहीचे ठाणेदार घारे करीत आहेत.