News34 chandrapur
चंद्रपूर - शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय म. रा. पुणे यांच्या तर्फे जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथील ४०० मी. सिंथेटिक धावणपथ, नॅचरल ग्रास फुटबाल मैदान व इतर क्रीडा सुविधांचे लोकार्पण व वॉकिंग ट्रॅक चे भूमिपूजन सोहळा कार्यक्रम दिनांक २४.१२.२०२२ रोजी ४.३० वाजता जिल्हा क्रीडा संकुल, सिव्हील लाईन चंद्रपूर येथे नियोजित होते.
Chandrapur politics news
Chandrapur politics news
मात्र या उदघाटन व भूमिपूजन कार्यक्रमआधी चंद्रपूरचे राजकारण चांगलेच तापले, स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांना काही न विचारता त्यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत छापले त्यांनी याचा विरोध करीत माझं नाव पत्रिकेतून वगळा असे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले. Chandrapur news
तर दुसरीकडे भाजपने शासकीय कार्यक्रमाच्या पत्रिका वगळून पक्षाच्या नावाने पत्रिका प्रकाशित केल्या, निधी शासकीय आहे भाजपचा नाही तर हा अतिउत्साही पणा कशाला असा टोमणा चंद्रपूर कांग्रेस अध्यक्ष रामू तिवारी यांनी मारला.
आज कार्यक्रम 4.30 वाजता जिल्हा स्टेडियम येथे होता त्यावेळी खासदार व आमदार धानोरकर दाम्पत्य पोहचले, तब्बल 2 तास त्यांनी पालकमंत्री मुनगंटीवार यांची वाट बघितली मात्र ते न आल्याने संतापून धानोरकर दाम्पत्यानी वॉलकिंग ट्रॅक चे भूमिपूजन स्वतः केले. Chandrapur district sports stadium
पालकमंत्री मुनगंटीवार यांनी वेळेचे भान ठेवायला हवे, सध्या चंद्रपुरात लोकप्रतिनिधी यांच्या अपमानाचे नाट्य होत आहे, ते आता थांबायला हवे, सत्ता येथे जाते, हा शासकीय निधी आहे, आम्हाला कार्यक्रम असतात मात्र आम्ही वेळेवर पोहचून सुद्धा आम्हाला 2 तास ताटकळत बसावे लागले, असा संताप खासदार धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केला.
7 वाजेनंतर पालकमंत्री मुनगंटीवार जिल्हा स्टेडियम पोहचले व वॉलकिंग ट्रॅक च्या भूमिपूजन स्थळी गेले, मात्र त्याचं भूमिपूजन आधीच उरकले होते, त्यावेळी प्रशासनाची तारांबळ उडाली व पुन्हा ट्रॅक चे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करीत अधिवेशन झाले असता मी वेळ काढून आलो आहे, कार्यक्रम सर्वाना असतात, व्यस्त वेळ असून सुद्धा मी कार्यक्रमात आलो, खासदार साहेब सुद्धा कार्यक्रमात वेळेवर जात नाही, उशीर झाला तर राग मानू नये.
शहरातील आझाद बगीचा उदघाटन प्रसंगी सुद्धा चंद्रपूरचे राजकारण असेच तापले होते, त्यावेळी आमदार जोरगेवार विरुद्ध पालकमंत्री मुनगंटीवार असा सामना रंगला होता, आता खासदार विरुद्ध पालकमंत्री असा सामना रंगला.
जिल्हा स्टेडियम च्या कार्यक्रमात वाद होणार हे नागरिकांना ठाऊक असल्याने नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम स्थळी उपस्थित झाले होते.