News34 chandrapur
चंद्रपूर - शहरातील दुर्गापुर परिसरात 13 डिसेंम्बरला पुन्हा क्रूर हत्याकांड घडले, विशेष म्हणजे दुर्गापुर पोलीस स्टेशनच्या अवघ्या 150 फूट अंतरावर प्रथमेश वाढई नामक युवकाने 52 वर्षीय विलास गणवीर यांची निर्घृणपणे हत्या केली. Chandrapur crime
हे हत्याकांड 12 डिसेंम्बरला चं घडले असते, त्यादिवशी प्रथमेश कुऱ्हाड घेऊन विलास ला संपविण्यासाठी आला होता, मात्र त्यादिवशी विलास हा प्रथमेश ला भेटला नाही,
आणि दुसऱ्याच दिवशी विलास ची हत्या झाली.
महेश मेश्राम नामक युवकाच्या हत्येला नुकताच महिनाभर लोटला असतांना पुन्हा घडलेल्या या हत्येने दुर्गापुरात चांगलीच दहशत माजली आहे. Brutal murder in chandrapur
मृतकाचे नाव विकास गणवीर (45) असून तो दुर्गापूर मधीलच रहिवाशी आहे. मृतक गणवीर यांची मुलगी आरोपी यांची दुसरी प्रेयसी होती. आरोपीचे नाव प्रथमेश वाढई (20) असे आहे. आरोपी वाढई याचे दोन मुलींसोबत प्रेम प्रकरण सुरू होते, पहिल्या प्रेयसीला दुसऱ्या प्रेयसी संदर्भात माहित झाल्याने तिच्या घरी जाऊन चर्चा करत असताना तिच्या वडिलांने पहिल्या प्रेयसीला हटकले ती बाब पहिल्या प्रेयसीने आरोपी वाढई याला सांगितलं, वाढई याने प्रेयसीला हटकल्या च्या कारणावरून दुसऱ्या प्रेयसीच्या वडिलाचा पोलीस स्टेशन जवळ धारदार शस्त्राने खून केला. घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलीस घटनास्थळी पोहचत आरोपीला ताब्यात घेतलं. पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे.
मृतक गणवीर यांना 3 मुली आहे, घरी कमावता गेल्याने गणवीर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, 3 मुली वडिलांविना पोरक्या झाल्या नसत्या.