News34 chandrapur
चंद्रपूर/दुर्गापूर - 7 नोव्हेंम्बरला दुर्गापुर पोलीस स्टेशन हद्दीत क्रूर हत्याकांड घडले होते, त्या हत्येनंतर 1 महिन्यांनी पुन्हा क्रूर हत्याकांड घडले असून यामध्ये 52 वर्षीय विलास गणवीर नामक इसमाची निर्घृण हत्या करण्यात आली असल्याची माहिती पुढे आली आहे. Chandrapur crime
ग्रामपंचायत उर्जानगर येथे सायंकाळी सदर हत्याकांड घडले असून मृतक गणवीर यांच्या गळ्यावर व पोटावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून आरोपी ला पोलिसांनी अटक केली आहे. Brutal murder
आरोपीचे नाव वाढई असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेचे कारण सध्या अस्पष्ट असून पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे.