News34 chandrapur
नागपूर - महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरू असून विरोधक शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचे प्रयत्न करीत आहे.
सध्या राज्यात कर्नाटक-महाराष्ट्र राज्याच्या सिमवादाचा प्रश्न पेटून उठला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोंमाई दररोज नवी विधाने करून धडकी भरविण्याचे काम करीत आहे.
आता या सिमवादाचा उपाय सुचवीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना एका खोलीत बंद करा व जोपर्यंत सिमवादाचा प्रश्न सुटणार तोपर्यंत दोघांनाही बाहेर काढून नका. Maharashtra Karnataka Border disput
सध्या सिमवादाचा प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयात असून त्याचा निकाल राज्याच्या बाजूने लागणार असल्याच्या भीतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री बोंमाई हे वादग्रस्त विधान करीत आहे. Karnatak cm bommai
काहीही असले तरी कर्नाटक च्या मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करावाच लागेल, सध्यातरी देशाच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एका खोलीत बंद करून जोपर्यंत सिमवादाचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत दोघांना खोलीत डांबून ठेवावे अशी प्रतिक्रिया कांग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली.