News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - मुल तालुक्यातील मौजा गडीसुर्ला येथील प्रगत शेतकरी श्री. गिरीश अगरकाटे यांच्या शेतातील १२ एकर जागेत यावर्षी अधिक भाव असलेल्या 555 स्वासिक मौल्यवान धानाच्या वाणाची लागवड केली होती. Breaking news
चुरण्याला काही दिवस वेळ असल्याने शेतातच चार - चार एकरचे तीन पुजने उभे करण्यात आले होते. काल दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी रात्रीच्या वेळेची संधी साधून काही अज्ञात व्यक्तींनी उभ्या असलेल्या चारही धानाच्या पुजण्याला आग लाऊन तीनही पूजने जळून खाक झाले. आज ही घटना शेतकऱ्यांच्या व गिरीश अगरकाटे यांच्या लक्षात आल्याने तात्काळ जाऊन पाहिले असता अजूनही तीनही पुजण्यांमधून हलक्या स्वरूपाचे आगीचे ज्वाला व धूर पेटतांना ग्रामस्थांना दिसून येत होत्या. यामधे जमीन मालकाचे अंदाजे चार लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. ही घटना कालच रात्रीच्या वेळेला झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. मुल तालुक्यातील ग्राम पंचायतीचा निकाल काल होता. यामधे गडिसुरला ग्राम पंचायतीच्या निकालाचा वचपा तर कोणी अज्ञात माथेफिरूने घेतला तर नसावा ? अशी शंका ग्रामस्थांमध्ये केली जात असून या घटनेची माहिती मुल पोलिसांना देतात तात्काळ मुल पोलिस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलिस निरीक्षक सतीश सिंह राजपूत ,पोलिस उपनिरीक्षक राठोड यांनी घटना स्तळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पुढील चौकशी करीत असल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या पोटाचा अन्न जळणाऱ्या आरोपीला पोलिस शोधून काढावे. आणि कारवाई करावी. तसेच शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी गिरीश अगरकाते व सौ वंदना अगरकाटे यांनी केली आहे.