News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर शहरात मागील अनेक वर्षांपासून वाहतुकीचा खोळंबा होत आहे, रस्ते अरुंद आणि वाहने रुंद झाली अशी अवस्था आज चंद्रपूर शहराची झाली आहे. Chandrapur police
दुचाकी, ऑटो व कार हे वाहन शहरात मोठ्या प्रमाणात आहे, वाहतुकीचा खोळंबा न व्हावा यासाठी वाहतूक विभाग प्रयत्न करीत असतो मात्र आता वाहनचालक सर्व नियम मोडीत काढत आहे.
शहरात वेगवान वाहनचालकांची संख्या सुद्धा वाढली आहे, त्यावर साथ मिळते ती दारूची.
14 डिसेंम्बरला मुख्य बस स्थानक चौकात शासकीय कर्मचारी काम आटोपून 9 वाजता ऑटो ची वाट बघत होता, तेवढ्यात वेगवान व दारुड्या ऑटो चालकाने शासकीय कर्मचारी गणेश मानकर यांना जोरदार धडक दिली. Chandrapur bus station
धडक इतकी जोरदार होती की गणेश मानकर यांना तब्बल 70 टाके पडले, त्यांना डोक्याला मार असून जबडा व पाय फ्रॅक्चर झाला. त्यावेळी उपस्थित जमावाने ऑटो चालकाला पकडले व रामनगर पोलीस स्टेशनमध्ये नेले.
मिळालेल्या माहितीनुसार ऑटो क्रमांक mh34 d 7967 च्या चालकाचे नाव वायकर आहे.
सद्या ते अतिदक्षता विभागात भरती आहे, मानकर यांचे कुटुंबीय व शासकीय कर्मचाऱ्यांनी रामनगर पोलीस स्टेशन गाठले, ऑटो चालक अति मद्य प्राशन केला असल्याने तो शुद्धीवर नव्हता, रामनगर पोलिसांनी ऑटो चालकविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल केला नाही, ऑटो चालकाचे कुटुंब त्या ठिकाणी पोहचले व ऑटो चालकाला घरी घेऊन गेले. कमीतकमी पोलिसांनी त्याचे मेडिकल करायला हवे होते, मात्र तसे न करता त्याला सोडून दिले, ऑटो सध्या पोलीस स्टेशनमध्ये आहे.
रामनगर पोलिसांनी तक्रार न घेण हे पहिल्यांदाच घडले नाही, याआधी अनेकदा असे प्रकार झाले आहे, वर्षभरापूर्वी एका मुलीने छेडछाडी तक्रार दिली होती मात्र रामनगर पोलिसांनी कारवाई न केल्याने त्या मुलीला आपला जीव गमवावा लागला. Ram nagar police
आज त्या ऑटो चालकाने भर चौकात दारूच्या नशेत जबर अपघात केला त्याठिकाणी कुणी लहान बाळ असत तर परिस्थिती काय असती? पोलीस कधी अश्या प्रकरणात संवेदनशीलता दाखविणार?
वाहतूक व परिवहन विभागाने दुचाकी चालक यांच्यावर Drunk & Drive ची कारवाई करतात त्याचप्रमाणे आता ऑटो चालकांवर सुद्धा याप्रकारे मोहीम राबवायला पाहिजे.
अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडल्याशिवाय राहणार नाही.