News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - दिनांक १४/१२/२०२२ रोज बुधवार ला मूल - चंद्रपूर रेल्वे मार्गावर मूल स्टेशन पासून एक कीलोमीटर अंतरावर नर चितळाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यु झाल्याचे सकाळी फीरायला जाना-या नागरीकांनी प्रत्यक्ष पाहिले याबाबतची माहिती नागरिकांनी वन कर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे यांना दिली. Chanda fort train
माहिती मिळताच, संजीवन संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे, याविभगाचे क्षेत्र सहाय्यक श्री मस्के, प्रशांत मुत्यारपवार, वनमजूर विशाल टेकाम , आशीष बोरकर हे घटनास्थळी जाऊन चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी कु.प्रियंका वेलमे यांचे मार्गदर्शनात घटनेचा पंचनामा केला. पशूवैद्यकीय अधिकारी श्री संदिप छौंकर यांनी चितळाचे शवविच्छेदन केले व नंतर त्याचे दहन करण्यात आले. वन्य प्राण्यांचे अशाच कारणाने जात असल्याने वनातील प्राणी कमी होत असून जंगलात राहणाऱ्या वाघाला त्याची शिकार मिळत नसल्याने वाघाची धाव गावाकडे,शेतीकडे होत आहे. Wild animal

वाघाने मानवाला ठार केल्याच्या अनेक घटना वाढतच असल्याचे दिसून येत आहे. याबाबत वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी वन मंत्रालयाने वनाला संरक्षण ताराची जाळी लावावी अशी मागणी ग्रामस्थांकडून व शेतकरी बांधवांनी केली आहे. असे केले तर भविष्यात मानव व वन्यप्राणी सुरक्षित राहतील.