News34 chandrapur
नागपूर - राज्यातील सत्तांतरानंतर विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाच्या 50 खोके एकदम ओके च्या घोषणेने परिसर दणाणून गेले.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरू केले असून विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाने विविध मुद्द्यांवर सरकारचा निषेध केला.
Maharashtra Winter Session 2022
Maharashtra Winter Session 2022
या आंदोलनात विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, अदिती तटकरे, राजेश टोपे, एकनाथ खडसे, नाना पटोले यांची उपस्थिती होती. Nagpur winter session
विधिमंडळाबाहेर विरोधी पक्षाकडून कर्नाटक सरकार हाय हाय.. बोम्मई सरकार हाय हाय… शिंदे सरकार हाय हाय… गद्दाराचे पाप महाराष्ट्राला ताप… खोके सरकार, खोटे सरकार… ५० खोके एकदम ओके… खोके सरकार काय म्हणतंय,गुजरातला प्रकल्प न्या म्हणतंय… शेतकऱ्याला मदत नाय म्हणतंय…महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक…मिंधे सरकारचा निषेध करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत विधानभवन परिसर दणाणून सोडला.