News34 chandrapur
चंद्रपूर - वेकोली चंद्रपूर क्षेत्राच्या लालपेठ उपविभागात मध्यरात्री डबल स्टोरेज क्वार्टर ची गॅलरी कोसळली, DSM क्वार्टर क्रमांक 30, 31 व 32 समोरील गॅलरी अचानक कोसळल्याने 26, 27 व 28 क्वार्टर क्रमांक हे तळ मजल्यावर व मध्यरात्री ची वेळ असल्याने कुणालाही इजा झाली नाही. Wcl chandrapur
परंतु तळ मजल्यावर असलेले लोखंडी टिनाचे शेडला नुकसान पोहचले, मागील अनेक वर्षांपासून सदर क्वार्टर ची दुरुस्ती चे काम वेकोलीच्या बांधकाम विभागाकडून होते, मात्र काम निकृष्ट दर्जाचे असल्याने अश्या घटना अनेक वर्षापासून वारंवार घडत आहे. Wcl lalpeth
एकदा क्वार्टर बांधले की त्यावर दुरुस्तीच्या नावाखाली लिपापोती करायची पण काम जैसे थे चं करायचे असा प्रकार सध्या वेकोली क्षेत्रात सुरू आहे.
वेकोली कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेच्या नावाखाली वेकोली मार्फत केलेली ही एकप्रकारची थट्टा चं आहे, सध्या वेकोली मार्फत गॅलरी चा कोसळलेल्या भागाचा मलबा उचलण्याचे काम सुरू आहे. The gallery collapsed
याबाबत लालपेठ उपविभागातील व्यवस्थापक मनीष पोडे, कामगार अधिकारी शिवा प्रसाद, सिटू संघटनेचे महामंत्री G. रमन्ना, व सुदामा यादव हे घटनास्थळी पोहचले.
रात्रीची वेळ असल्याने कामगार आपल्या घरी होते, अन्यथा मोठी जीवितहानी याठिकाणी घडली असती.
या घटनेबाबत उपविभागीय अधिकारी लालपेठ मनीष पोडे यांनी लालपेठ परिसरातील वेकोली कामगारांच्या जुन्या झालेल्या वसाहतीमध्ये सर्व्हे करीत तात्काळ दुरुस्ती करण्याचे काम सुरू करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.