News34 chandrapur
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी येथील न्यायालयाच्या गेटला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना ब्रम्हपुरी येथे घडली.
ब्रम्हपुरी न्यायालयासमोर नव्या इमारतीचे बांधकाम सुरू असून या इमारतीच्या मुख्य गेटला एका युवतीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. युवतीचे नाव पौर्णिमा मिलिंद लाडे (27)असे आहे. ती गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील रहिवासी आहे. Suicide news chandrapur
मृतक युवती ब्रम्हपुरी ला पेपर देण्यासाठी जाते असे घरी सांगून दि.5 डिसेंबर ला ब्रम्हपुरी ला आली मात्र 6 डिसेंबर ला सकाळी तिचा मृतदेह गळफास लागलेल्या अवस्थेत नागरिकांना आढळून आला.
पौर्णिमा ने आत्महत्या का केली? याबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या, पोलिसांनी याबाबत तपास केला असता त्यांना प्राथमिक स्वरूपात माहिती मिळाली.
ब्रम्हपुरी येथील न्यायालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यासोबत दिड वर्षा अगोदर मृतक पोर्णिमाचे लग्न जमले होते, मात्र काही अपरिहार्य कारणाने त्यांचे काही दिवसातच त्यांचे लग्न तुटले असल्याची माहिती आहे. मात्र मला याच मुलासोबत लग्न करायचे आहे असा मुलीचा हट्ट होता. मुलाकडून लग्न तुटले असल्याने मुलाचा व कुटुंबीयांचा नकार असल्याचे समजते. मृतक पौर्णिमा ही दिनांक 5 डिसेंबरला न्यायालयीन परिसरात वावरत असल्याचेही समजते, मात्र आत्महत्या करण्याचे मुख्य कारण अद्याप अस्पष्ट असून त्याचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करत आहे.
टीप - प्रथम दर्शनी प्राथमिक माहितीनुसार बातमीमध्ये एका व्यक्तीचे नाव चुकीने प्रकाशित झाले होते. सदर घटनेशी संबंधित व्यक्तीचा कुठलाही संबंध नाही. ही बाब लक्षात येताच सदर नाव वगळण्यात आले असून, ही बातमी सुधारित अपडेट केली आहे. या बातमीच्या माध्यमातून कोणाचीही बदनामी करण्याचा आमचा हेतू नाही.