News34 chandrapur
चिमूर - सुश आसरा फौंडेशन इंडिया व अत्पलवर्णा कुंग फु कराटे अँड फिटनेस असोसिएशन नेरी च्य संयुक्त विध्यमाने चिमूर येथे पहिल्यांदाच कराटे स्पर्धा संपन्न झाली असून घुघुस टीम राष्ट्रीय स्तरावर अव्वल ठरली.
Kung Fu Karate Tournament 2022
चिमूर येथील शहीद बालाजी रायपूरकर सभागृहात कुंग फु कराटे स्पर्धा २०२२, अत्पलवर्ना कुंग फु असोसिएशन नेरी चे ग्रँडमास्टर शिफु डॉ सुशांत इंदोरकर यांचे मार्गदर्शनात नुकतीच पार पडली असून या स्पर्धेत जवळपास ३५०-४०० कराटे खेळाडूंनी सहभाग दर्शवित कौशल्य सादर केलीत. पूर्व विदर्भ तसेच इतर राज्य येथून २९ कराटे टीम नी भाग घेत ही स्पर्धा गाजविली.
बक्षीस वितरण प्रसंगी डॉ.आशिष पाटील, डॉ दिलीप शिवरकर सुश आसरा फौंडेशन मुख्य संचालिका पायल कापसे, विवेक कापसे, आप चे डॉ अजय पिसे ,डॉ खानेकर ,डॉ बोरकर पूर्णिमा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शिफु विशाल इंदोरकर यांनी सूत्रसंचालन व व्यवस्थापन तर एरेना व बाउट व्यवस्थापन शिफु पिपलायन आष्टनकर यांनी केले. ऑफिसियल म्हणून मास्टर्स पंकज चौधरी, भोलानाथ शेंडे, आदित्य फुलझेले, विशाल बारस्कार सुदर्शन बावणे, मंगेश वाढरे, कल्याणी मुनघाटे,जागृती मरसकोल्हे, सुनील सातपैसे, समीर पठाण, राहुल गाहूकर, मयूर कुंदोजवार,गणेश चन्ने, कैलास राखडे, मानसी वाढरे, श्रद्धा साठोणे, लकी नगराळे, साहिल उपरकर, हर्षल फाये यांनी मेहनतीने काम पाहिले.
शिहान श्याम भोवते सर व सेंसाई विनय बोढे यांनी कराटेचे प्रमुख रेफरी तसेच शिहान शरद चिकाटे सर, मा विनोद पुणेकर सर, मा यनकन्ना पवार, मा सतीश भडके सर यांनी कुंग फु चे प्रमुख रेफरी होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुश आसरा फौंडेशन च्या रागिणी गोहणे, दुर्गा धनोरे, हरिश पिसे, पूर्णिमा पाटील ,सौरभ निनावेकर, हिमांशू किरीमकर, विवेक कापसे, गीतांजली थुटे, बालु हेलवटकर आदी सुश आसरा फौंडेशन व कराटे असोसिएशनचे सदस्यांनी परिश्रम घेत स्पर्धा यशस्वी केली.