News34 chandrapur
चंद्रपूर - शहरातील मुख्य बस स्थानक चौकात 14 डिसेंम्बरला रात्री 9 वाजता शासकीय कर्मचारी गणेश मानकर हे कर्तव्यावरून परत घरी जात असताना त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत सुसाट ऑटो चालकाने मानकर यांना जोरदार धडक दिली.
ऑटो चालक मनोहर वायकर हा आपल्या ऑटो क्रमांक MH34D7967 बेधुंद अवस्थेत सुसाट चालवीत होता, अपघात झाल्यावर सुद्धा तो अति दारूच्या नशेत होता, नागरिकांनी त्याला चांगलेच बदडले, मात्र जखमी झालेल्या मानकर यांना हनुवटी, पाय व जबडा फ्रॅक्चर झाला, त्यांना तब्बल 70 टाके लागले. Chandrapur news
याबाबत शासकीय कर्मचारी व नागरिकांनी ऑटो चालकाला रामनगर पोलीस स्टेशनमध्ये नेले, मात्र त्यावेळी पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल न करता ऑटो चालकाला सोडून दिले.
इतकेच नव्हे तर ऑटो चालकाची मेडिकल चाचणी सुद्धा करण्यात आली नाही, पोलिसांनी फिर्याद नोंदविण्यासाठी आलेल्या नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली. dereliction of duty
दुसऱ्या दिवशी जखमी गणेश मानकर यांचे बंधू शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष निमेश मानकर यांनी रामनगर पोलीस स्टेशन गाठले, त्यावेळी पोलिसांनी कलम 279, 338,184 गुन्हा दाखल केला.
14 डिसेंम्बरला ऑटो चालक मनोहर वायकर यांची मेडिकल चाचणी केली असता drunk अँड ड्राईव्ह व निष्काळजीपणाने वाहन चालवीत जीवितास धोका निर्माण याबाबत गुन्हा दाखल झाला असता मात्र पोलिसांनी त्याबाबत साधी चौकशी सुद्धा केली नाही, याप्रकरणी आर्थिक व्यवहार झाला असल्याचा आरोप निमेश मानकर यांनी लावला आहे. Suspend the police
रामनगर पोलिसांनी हेतू परस्पर व जाणीवपूर्वक प्रकरणात गंभीरता दाखविली नाही, म्हणून त्यावेळी उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी व ड्युटी ऑफिसर यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तात्काळ निलंबित करावे अशी मागणी निमेश मानकर यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधीपक्ष नेता अजित पवार, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी चंद्रपूर, पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना केली आहे. Chandrapur police
रामनगर पोलिस ठाण्यात फिर्यादीची तक्रार न घेणे व गंभीर प्रकरणात कारवाई न करणे हे काही नवे नाही, याआधी सुद्धा एका मुलीच्या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली नाही काही दिवसांनी त्या मुलीची हत्या झाली होती.