News34 chandrapur
चंद्रपूर - महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवारी भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरु केल्या, असे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा खासदार बाळू धानोरकर यांना चांगलाच समाचार घेतला.
महात्मा फुले धनाढ्य होते. चंद्रकांत पाटलाच्या दहा पिढ्या विकत घेवू शकतील, एवढी त्यांची एेपत होती. फुले, आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपली संपत्ती आणि जीवन बहुजनांच्या उद्धारासाठी खर्ची घातले. मागील काही दिवसांपासून भाजपकडून नियोजितपणे बहुजन महापुरुषांच्या चारित्र्य हननाचा प्रयत्न सुरु आहे. पाटील यांचे नवे वक्तव्य याच षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप खासदार बाळू धानोरकर यांनी आरोप केला. An insult to great men
या देशातील बहुजानांच्या शिक्षणासाठी कधीही राष्ट्रीय स्वयंसेवकांने कधी प्रयत्न केले नाही. बहुजन महापुरुषांनीची त्यांसाठी आपले जीवन आणि संपत्ती खर्ची घातली. त्यांच्या कार्याने प्रेरीत होवून लाखो लोकांनी या महापुरुषांना मदत केली. त्यामुळे आजची पिढी शिकू शकली. याचा विसर पाटील यांनी पडला आहे. पाटील यांचे वक्तव्य सहज आले नाही. हे त्यांनी जाणीवपूर्वक केले आहे.
आधी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंडीत नेहरूंची बदनामी आणि चारित्रहननची मोहीम याच लोकांनी राबविली.
Absurd statement
आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी भाजप नेत्यांची बेताल वक्तव्य करण्याची स्पर्धा सुरु आहे. यामागे मोठे षडयंत्र आहे. मात्र आमच्या आदरस्थानांविषयी कुणीही बेताल वक्तव्य करीत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. पाटील यांनी महाराष्ट्रातील जनतेची नाक घासून माफी मागितली पाहीजे. महाराष्ट्रातील फुले- शाहू-आंबेडकरांचा वैचारिक वारसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नष्ट करायचा आहे. पाटील त्याचं शाखेतील विद्यार्थी आहे. म्हणून खोटा इतिहासाची त्यांना माहिती आहे. यापुढेही बहुजन महापुरुषांच्या बदनामीची मोहीम या लोकांकडून आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. परंतु तो प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असा इशाही खासदार धानोरकर यांनी दिली. चंद्रकांत पाटील यांनी ही टीका करतानाच महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवारी भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक क्रांतीचा पाया देशात रोवला याची कबुली दिली,असा चिमटा धानोरकर यांनी घेतला.
