News34 chandrapur
दिल्ली - भारतातील Truecaller वापरकर्त्यांसाठी आता महत्वाची सुविधा मिळणार आहे, देशातील प्रशासकीय अधिकारी व कार्यालयाचे संपर्क क्रमांक एका क्लिक वर trucaller app च्या माध्यमातून मिळणार आहे.
भारतीय लोक Truecaller हे अॅप मोठ्या संख्येने वापरतात. हे एक कॉलर आयडेंटिफिकेशन अॅप आहे, ज्यामध्ये तुम्हाला आता अनेक सुविधा मिळतात. अॅप एक नवीन वैशिष्ट्य आणले आहे, ज्याद्वारे तुम्हाला सरकारी फोन डायरेक्ट जोडला जाऊ शकतो. यामुळे नागरिक आणि सरकारी कार्यालयांध्ये संपर्क आणि संवाद वाढणार आहे.
या डायरेक्टरीमध्ये अॅप यूजर्संना हजारो व्हेरिफाइड सरकारी अधिकाऱ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर उपलब्ध होणार आहे. या अॅपमधील यादीत तुम्हाला हेल्पलाईन नंबर, कायद्याची अंमलबजावणी करणार्या संस्था, शिक्षण संस्था, रुग्णालये आणि इतर महत्त्वाचे क्रमांक मिळणार आहेत. तसेच Truecaller वर २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारी एजेंन्सीच्या डिटेसल्स उपलब्ध होणार आहेत.
कंपनीने दिलेल्या या नवीन अॅपमधील सुविधेमुळे डिजिटल गव्हर्नमेंटच्या दिशेने पाऊल टाकत असल्याचे स्पष्ट होते. यामुळे फसवणूक, घोटाळा रोखण्यासाठी मदत होऊ शकते. तसेच यामुळे डिजिटल कम्युनिकेशनला देखील उभारी मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
