News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यात सेवा देणारे महाराष्ट्र पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा पोलीस महासंचालक तर्फे विशेष सेवा पदक प्रदान करण्यात येणार आहे. Chandrapur police
याबाबत गृह विभागातर्फे अधिसूचना काढण्यात आली असून नक्षलग्रस्त जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवाया परिणामकारक रित्या आळा घातल्याबद्दल सदर सेवा पदक देण्यात येणार आहे.
यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहाद्दूरे, पोउपनी प्रदीप राठोड, प्रवीण सोनोने, शैलेश जगताप, चंदा दंडवते, दीपक मस्के, नीलम डोंगरे, विजय कोरडे, धर्मराज पटले, अनंता ठाकरे, सचिन गदादे, सचिन यादव, गजानन दराडे यांचा समावेश आहे.
