News34 chandrapur
चंद्रपूर - मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये सुरू असलेल्या खाण क्षेत्रातील संधी या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यात सोन्याच्या खाणी असल्याचा दावा केला आहे. Gold Mine In chandrapur
या दाव्यानंतर अनेक हालचाली सुरू झाल्या आहे, केंद्रीय खनिकर्म विभागाच्या सर्व्हेक्षणात सोन्याची खाणं असल्याची नोंद करण्यात आली होती.
चंद्रपूर येथील गोंडपिपरी तालुक्याच्या भूगर्भात मौल्यवान प्लॅटिनम, सोने आणि दुर्मिळात दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे रूथेनियम, रेडिअम, इरेडिअम धातू असल्याचं दहा वर्षांपूर्वी झालेल्या एका संशोधनातून समोर आलं आहे. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या शास्त्रज्ञांनी तालुक्यात २००७ ते २०१०मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेत हे उघड झालं होते. Geological Survey of India
खरंच चंद्रपूर जिल्ह्यात सोन्याची खाणं असू शकते का? याबाबत ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष व भूगोल अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांच्याशी मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या सोन्याची खाणं या वक्तव्याबाबत विचारले असता त्यांनी सरळ शब्दात उत्तर दिलं.
चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा, तांबे याचा भरपूर प्रमाणात साठा असल्याची माहिती दिली आहे. Platinum
2 वर्षापूर्वी वरोरा तालुक्यात आम्हाला सुद्धा सोने असल्याचे अवशेष आढळले होते, पण सोन्याचा साठा व्यावसायिक दृष्ट्या चंद्रपूर जिल्ह्यात असणार हे नक्की नाही. Diamonds
ज्यावेळी आमच्या सर्व्हेक्षणात सोन्याचे अवशेष असल्याची नोंद करीत तो अहवाल केंद्र शासनाला पाठविला मात्र आजपर्यंत त्याबाबत काही उत्तर आम्हाला मिळालेलं नाही.
सोन्याची खाणं म्हणजे त्याचा साठा मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आहे असा त्याचा अर्थ पण तसे काही नसून इतका साठा आपल्याकडे उपलब्ध नसल्याचा दावा चोपणे यांनी केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात डायमंड, प्लॅटिनम, रुथेनियम उपलब्ध आहे पण त्याचा साठा कमी प्रमाणात आहे.
