News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मूल- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागत वनविभाग बफर झोन तयार केला. आणि व्याघ्र प्रकल्पात आणि बफर झोन क्षेत्रात वाघाला मोकळे सोडले आहे. परंतु जंगलाला लागूनच शेकडो शेतकऱ्यांची शेती आहे. व शेती केल्याशिवाय पर्याय नाही. Tadoba tiger project
तेव्हा वनविभागाने आपल्या जंगलाला संरक्षण भिंत बांधावी किंवा तारेच्या जाळीचे कुंपण करावे जेणे करून शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे वाघ वन्य प्राणी हल्ला करणार नाही. ही बाब शासनाच्या व वनविभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या केव्हाच लक्षात मी लोकप्रतिनिधी म्हणून लक्षात आणून दिली आहे. परंतु अशा महत्वाच्या समस्या कडे शासनाचा वनविभाग लक्ष देत नाही. म्हणून आज एका वर्षात मुल तालुक्यात २४ घटना वाघाने मानवाला ठार केल्याच्या घडल्या आहेत. याला कारणीभूत वनविभाग व अधिकारी आहेत. आपल्या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त न करता उलट वनविभागाचा व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापूर्वी व्याघ्र प्रकल्पाचे गेट २१ होते त्यात पुन्हा ७ गेट वाढविनार असल्याचे माजी मंत्री शोभाताई म्हणाल्या. यामधे पूर्वी सकाळी व सायंकाळी अशा दोन वेळेलाच वाघ बघण्याची सफारी होती ती आता १२ तासाची केली आहे. पूर्वी वाघाची संख्या २०० होती ती ३०० झाली आहे. Human Wildlife Conflict Chandrapur

सफरीच्या एका गाडीचे कोर ४५ हजार रुपये केली तर बफर मधे ४२ हजार कोर रुपये केली. यावरून असे दिसून येते की, वन विभाग मानवाला मारुन पैसे कमविण्याचा धंदा करीत असल्याचा आरोप माजी मंत्री शोभाताई फडणविस यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. वाघ, बिबट किंवा रानटी डूकर मानवावर व शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ला करून दररोज बिबट्या हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. आता वनविभागाने गंभीरपणे याची दखल घेणे आवश्यक आहे. वन्यप्राणी वनक्षेत्र सोडून रहिवासी क्षेत्रात अतिक्रमण करणार करीत आहेत. यासाठी दूरगामी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. आणि जर का उपाय योजना केली नाही तर मात्र भविष्यात मानव वन्यप्राणी संघर्ष बाजूला राहील आणि वनविभाग व जनता यांच्यातच संघर्षाची पेटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. असाही इशारा शोभाताई यांनी दिला आहे.
जिल्ह्यात दररोज गोरगरीब शेतकरी, शेतमजुरांचा वाघाच्या हल्ल्यात बळी
ताडोबा बफर व कोअर झोन क्षेत्रात भरमसाठ प्रवेशद्वार सुरु झाल्याने होणारा गोंगाट, गेटजवळील रिसोर्टचे माध्यमातून सुरु झालेली झगमग आणि रिसॉर्ट करीता खाजगी व्यवसायिक देखील जांगलालगतच्या जमिनी खरेदी करुन ठेवीत असल्याने भविष्यात जंगल क्षेत्र कमी होणार व वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास संपुष्टात येऊन प्राणी मानव वसाहतींकडे आगेकूच करून नाहक अधिक मानवाचे बळी जातील. त्यामुळे भविष्यात वाढणारी वन्यप्राण्यांची संख्या व पर्यटकांची गर्दी बघता मानव प्राणी संघर्ष होण्याला थांबविणे शक्य होणार नसल्याचे चित्र दिसत आहे.
शासन मरणाऱ्यांच्या कुटुंबीयांना २० लाख रुपये देऊन मोकळे होत आहे. वनविभागाने जीवनाची किंमत लावण्यापेक्षा आपल्या वाघांच्या व वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी सुरक्षा कवच म्हणून भिंतीवर किंवा तारेच्या जाळीच्या कुंपणावर खर्च केले तर जंगलातून वन्यप्राणी बाहेर निघणार नाही आणि मानवाचे बळी सुद्धा जाणार नाही. यासाठी नियोजन करावे असेही माजी मंत्री शोभाताई म्हणाल्या. याप्रसंगी अविनाश जगताप,महेंद्र करकाडे, लोकनाथ नर्मलवार, संजय मारकवार, विपीन भालेराव,साहिल येंनगंटीवार आदी उपस्थित होते.नियोजन करून जीवन देण्याचे काम करणे आवश्यक आहे.