News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील मनसे पक्षात मोठे फेरबदल करण्यात आले असून आता महिला संघटनेत सुद्धा पक्षाने जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड यांची उचलबांगडी करीत शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकूर यांची महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी बढती करण्यात आली आहे. Mns adhikrut
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते प्रतिमा ठाकूर यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी संदीप देशपांडे, अविनाश जाधव, राजू उंबरकर व सचिन भोयर यांची उपस्थिती होती.
अनेक वर्षांपासून मनसे महिला संघटनेत कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या रखडलेल्या नियुक्त्या व पक्ष संघटन बळकट करण्याकडे स्थानिक पदाधिकारी दुर्लक्ष करीत होते, आता प्रतिमा ठाकूर यांच्या नियुक्तीने मनसे महिला संघटनेला नवसंजीवनी मिळणार काय याकडे पक्षाचे लक्ष लागले आहे.

