News34 chandrapur
चंद्रपुर - स्थानिक शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय, तुकूम ,चंद्रपुर येथील गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली "विद्यार्थी सुविधा" केंद्राला युवासेना yuvasena चे गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. निलेश र बेलखेडे यांची भेट देऊन विद्यार्थी हिताय, सोईसाठी सुरू केलेल्या विद्यार्थी केंदात सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. Student Facilities Center
यावेळी सुरू असलेल्या कामावर समाधान व्यक्त करत सोबतच गोंडवाना विद्यापीठ अतंर्गत विद्यार्थी सुविधा केंद्र फलक नविन बनवून दर्शनीय स्थानी लावावे जेणेकरून विद्यार्थ्यांना येता जाता माहीतीस येईल तसेच जिल्ह्यातील विद्यार्थांची गैरसोय होणार नाही, त्यांचे कामे वेळेवर व्हायला हवी याची काळजी घ्यावी याबद्दल सुचना केल्या.
Gondwana University Senate Member
यावेळी सिनेट सदस्य प्रा निलेश र बेलखेडे यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या या अग्रस्थानी ठेवून चांगले दर्जेदार रोजगाराभिमुख शिक्षण त्यांना मिळावे, त्यांना येणार्या शैक्षणिक समस्या चे निराकारण करण्यासाठी प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन केले.
