News34 chandrapur
चंद्रपूर/यवतमाळ:- म्हणतात ना राजकारणात काहीही शक्य आहे, लोकसभेची निवडणूक हरल्यावर घरी न बसता पक्षाच्या कामात सतत व्यस्त असणाऱ्या अहिर यांना केंद्र सरकारने मोठी जबाबदारी सोपविली.
न थकता सतत विविध राज्यात पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करीत त्यांना जिंकून आणण्याची यशस्वी जबाबदारी अहिर यांनी पार पाडली. Hansraj ahir
पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी निवड घोषित केल्यानंतर ते दि 28 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीस रवाना होत असून आपल्या या दौऱ्यात ते पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी व वरिष्ठांच्या भेटी घेतील. Hansraj ahir दि. 30 नोव्हेंबर रोजी हंसराज अहीर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार सांभाळतील.
