News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - तालुक्यातील हळदी येथील उमा नदीपात्रातील एकाच रात्री पाच कृषी विद्युत पंप चोरीला गेल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. परिसरात विद्युत मोटर पंप चोरी टोळी सक्रिय असावी असा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
Theft of agricultural pump
या आधीही अशा घटना घडल्या; मात्र, कोणत्याही प्रकारचा तपास लागलेला नाही. गुरूवारी रात्री सुमारे पाच विद्युत पंप चोरीला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुमारे एक लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे साहित्य चोरट्यांनी लांबविले. त्यामुळे शेती करावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
नदीकाठावर मोटर पंप घेऊन अनेक शेतकऱ्यांनी पाइपलाइन करून शेतीला पाणी नेले. खरिपातील याच पाण्याद्वारे धानाचे उत्पन्नही घेतले. खरीप हंगाम संपला. रब्बी हंगामाचे नियोजन सुरू असताना चोरट्यांनी विद्युत पंप चोरण्याचा धडाकाच लावला आहे. मोटर पंप चोरून नेण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे शेतीला पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. नवीन विद्युत पंप बसविण्याशिवाय पर्याय राहिला नाही तर, पुन्हा विद्युत पंप चोरला जाणार नाही याचीही खात्री राहिली नाही. विद्युत पंप चोरीच्या घटनेने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
पोलिस विभागाकडे तक्रार दाखल होतात; मात्र, पुढे कोणताही तपास लागत नसल्याने चोरट्यांचे फावले आहे. अशातच गुन्हेगाराला सजा केव्हा? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शेतातील विद्युत पंप बसविण्यासाठी प्ननास हजारांपेक्षा अधिक खर्च येतो. विद्युत पंप चोरीला गेल्यानंतर शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक असे दुहेरी नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतकरी द्विधा मनस्थितीत आहे.
नैसर्गिक संकटाचा सामना करीत शेतकरी उत्पन्न वाढीचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच उन्हाळ्यातही हंगामी पिकांचे उत्पादन घेण्यावर भर देण्यात आला असताना मुल तालुक्यातील शेतकऱ्यांना वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागत आहे. खरीप हंगामानंतर रब्बी हंगामाचे नियोजन करीत असताना हळदी गावगन्ना, तुकूम गावातील तब्बल पाच कृषिपंप हे चोरीला गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
तसेच मुल गडचिरोली हायवे मार्गावर चीमढा, टेकाडी, चांदली, खेडी या गावातील शेतकऱ्यांनी रानटी डुकराचा बंदोबस्त करण्यासाठी ब्याट्रिवर ताराचा करंट शेतीच्या सभोवताल लावले असता आठ ते दहा हजार रुपये किमतीची ब्याट्री चोरांनी लंपास केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. चीमढा
तीन दिवसांपूर्वी गडचिरोली हायवे मार्गावर चीमढा नदीच्या पुलावर पाच युवक रात्रीच्या वेळेला गप्पा करीत असताना पुलाला लागून असलेल्या शेतकऱ्यांनी त्या अज्ञात युवकांना इथे काय करता असे विचारले असता आमची शेती इथेच आहे. आमचा चुरणा चालू असल्याचे खोटे व बनवा- बनविचे उत्तर दिले त्यामुळे त्यांनाही संशय आला आहे. अशीच टोळी मोटार पंप चोरी करणारी असावी असा संशय व्यक्त केल्या जात आहे.
शेतकऱ्यांची पोलिसांत धाव.
एकाच रात्री पाच कृषिपंपाची चोरी झाल्याने गावातील इतर शेतकऱ्यांचाही झोप उडाली आहे. शिवाय चोरट्यांना जेरबंद करावे व भविष्यात अशा घटनांना आळा बसवण्य़ासाठी पोलीस प्रशासनाने यंत्रणा राबवण्याची मागणी नामदेव गावतूरे, नीलकंठ चलाख, सुनील कोतकोडावार, रूपचंद चलाख, महेश मुमडवार या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी पोलिस विभागाकडे केली आहे. असून शेतातील मोटरपंप चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेणे मुल - सावली पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे. अडचणीच्या प्रसंगी हजारो रुपयांचे मोटारपंप सध्याच्या प्रतिकूल परीस्थितीमध्ये विकत आणायचे तरी कसे असा सवाल शेतकरी बांधवांनी केला असून पोलिसांनी अशा चोरांना पकडावे असे आव्हान शेतकरी बांधवांनी केली आहे.
"परिसरात मोठ्या प्रमाणात कृषी विद्युत पंप चोरीचे प्रकार नियमित होत आहेत. विद्युत पंप चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. विद्युत पंप चोरीला गेल्यामुळे शेती करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित होत असून पोलीस विभागाने याची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर योग्य ती कडक कारवाई करावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा."
