News34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - चीचपल्ली वनपरिक्षेत्र मधील वाघाच्या व रानडुकराचा हल्यात ठार झालेल्या इसमाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत शासनाच्या वतीने मंजूर करुन त्यांना वितरित करण्यात आली. Tiger attack
वन परिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेल्मे यांनी ग्रामस्थांना मदत मिळून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याने त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. तसेच जंगल परिसरात वन्य प्राणी येऊ नये यासाठी संरक्षण जाळी लावण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून याप्रसंगी मदतीचे चेक वन परिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांचे हस्ते देण्यात आले. Chandrapur forest
1. समीर शरद शेंडे रा. कांतांपेठ डुक्कराच्या हल्यात जखमी दिनांक-12/06/2022 रक्कम -1,25000/-
2. एवणाथ विकरुजी चूनारकर रा. चिरोली वाघाचे हल्यात मृत्यु दिनांक-11/10/2022अदा केलेली रक्कम -10,00000/-
3. श्री. ढीवरू पत्रू वासेकर रा. चिचाडा वाघाचे हल्यात मृत्यु दिनांक -19/10/2022 अदा केलेली रक्कम -10,00000/-
4. नानाजी सुकरु नीकेसर रा. चिचाडा वाघाचे हल्यात मृत्यु दिनांक -19/10/2022 अदा केलेली रक्कम -10,00000/- चेक वितरण करताना प्रियंका वेलमे व. प. अ. चिचपल्ली , श्री. विजय दुर्गे पोलीस पाटील, चिचाडा, श्री. एम. जे. मस्के क्षेत्र स. मुल, श्री. एस. डी. मरस्कोल्हे व. र. मुल उपस्थित होते.
