News34 chandrapur
चंद्रपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा देशात सुरू आहे. Bharat jodo yatra सध्या या यात्रेचा प्रवास महाराष्ट्रातून सुरू आहे.
या यात्रेच्या समर्थनार्थ चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (ता. ११) सायंकाळी ६ वाजता मशाल यात्रा काढण्यात आली. Congress mashal rally
या यात्रेच्या समर्थनार्थ चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (ता. ११) सायंकाळी ६ वाजता मशाल यात्रा काढण्यात आली. Congress mashal rally
शहरातील गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून यात्रेला सुरुवात झाली. शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण यात्रा जटपुरा गेट परिसरात पोहचली. त्यानंतर तेथील महात्मा गांधी पुतळा परिसरात यात्रेचा समारोप झाला.
यात्रेत खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे, प्रदेश सचिव विजय नळे, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, शहर महिला जिल्हाध्यक्ष संगीता अमृतकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.