News34 chandrapur
चंद्रपूर - 23 नोव्हेंम्बरला चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरील हनुमान मंदिरातील मूर्ती विटंबना केल्याची घटना घडली, 24 नोव्हेंम्बरला सदर वार्ता वाऱ्यासारखी जिल्ह्यात पसरल्याने विश्व हिंदू परिषद व भाजप कार्यकर्त्यांनी दोषींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करू लागले अन्यथा चंद्रपूर बंद करू असा इशारा यावेळी देण्यात आला होता.
Chandrapur crime
Chandrapur crime
त्यांनतर जिल्ह्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांना सदर प्रकरणाचा तात्काळ छडा लावा यासाठी निर्देश दिले.
यंग चांदा ब्रिगेड ने सुद्धा जिल्हा पोलीस अधीक्षकाना निवेदन देत विटंबना करणाऱ्या समाज कंटकाला अटक करावी अशी मागणी केली.
परिस्थिती चिघळू नये यासाठी सदर प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आले, बल्लारपूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळे पथक तयार केले. Chandrapur police
सदर विटंबना ही मनोरुग्ण व्यक्ती द्वारे केली असल्याचा अंदाज स्थानिक गुन्हे शाखेने लावला होता, त्यांनतर 24 नोव्हेंम्बरला बल्लारपूर व गोंडपीपरी मार्गावर पथक गस्त घालत असताना एक संशयित व्यक्ती पोलिसांना आढळला, त्या व्यक्तीच्या कपड्यावर तेल व शेंदूर लागल्याचे दिसून आले. Psychopath
पोलिसांनी त्याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने त्या मूर्तीची विटंबना केली असल्याची कबुली दिली, सदर व्यक्ती हा नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असून तो घरून 1 महिन्यापासून भटकंती करीत आहे, आरोपी व्यक्ती हा मनोरुग्ण असल्याची खात्री स्थानिक गुन्हे शाखेला पटली असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे. Desecration of idols
स्थानिक गुन्हे शाखेने परिस्थिती चिघळण्याआधी सदर प्रकरणाचा 24 तासाच्या आत छडा लावला.
सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सपोनि विकास गायकवाड, सपोनि मुलानी, सपोनि संदीप कापडे, सपोनि जितेंद्र बोबडे, सलीम शेख, आनंद परचाके, सुधाकर वरघणे, सतीश पाटील, लिकेश नायडू, सीमा पोरते यांनी केली.
पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.
