News34 chandrapur
चंद्रपूर - रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे मधुकर पेशट्टीवार हे मुलीला भेटण्यासाठी पुणे येथे 12 नोव्हेंम्बरला घराला लॉक लावून गेले होते. 22 नोव्हेंम्बरला पेशट्टीवार यांनी त्यांचे नातेवाईक अजय पुप्पलवार यांना एकदा घरी जाण्यास सांगितले होते, पुप्पलवार हे घरी पोहचताच घराचा लॉक तुटलेला व सामान अस्तव्यस्त होते. Burglary in chandrapur
त्यांनतर पुप्पलवार यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार दिली. घरी सोन्याचे दागिने आलमारी ठेवले होते अशी माहिती पेशट्टीवार यांनी दिली होती. Crime news
तपास केल्यावर निदर्शनास आले की सोन्याचे दागिने आलमारीतुन अज्ञातांनी लंपास केले, घटनेची दखल घेत गुन्हे शोध पथकाचे सपोनि हर्षल एकरे आपल्या चमुसह पोहचले.
गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला असता त्यांना मुखबिर द्वारा माहिती मिळाली की एक युवक सोन्याची अंगुठी विकण्याकरिता येणार आहे, सापळा रचत पोलिसांनी त्याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने पेशट्टीवार यांच्या घरी चोरी केली असल्याची कबुली दिली. Robbery
या प्रकरणात पोलिसांनी 22 वर्षीय विशाल सुधीर पाटील, 19 वर्षीय कबीर अरुण पाझारे दोन्ही राहणार सिस्टर कॉलोनी व आनंदनगर महाकाली कॉलॉरी येथे राहणारा श्रीकांत उर्फ बोटतुटया राजू चुनारकर यांना अटक करण्यात आली, तिन्ही गुन्हेगार हे पोलीस रेकॉर्डवरील आहे.
आरोपिकडून पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज असा एकूण 1 लाख 35 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. Ram nagar police
आरोपीनी या घरफोडी सोबत पुन्हा एक चोरी केली असल्याचे कबूल केले.
सदर यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस निरीक्षक राजेश मुळे, गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि हर्षल एकरे, पोउपनी विनोद भुरले, पोउपनी मधुकर सामलवार, रजनिकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, किशोर वैरागडे, लालू यादव, विकास जुमनाके, विनोद यादव, सतीश अवथरे, विकास जाधव, हिरालाल गुप्ता, संदीप कामडी व भावना रामटेके यांनी केली.
