News34 chandrapur
चंद्रपूर - शहरातील दिव्यानी भुपेंद्र उपरे (गणफाडे) यांनी थेट mrs. india contest 2022 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या स्पर्धेत दिव्यानी ने उंच भरारी घेतली आहे, दिव्यानी उपरे या Interior designer तसेच BIT कॉलेज मध्ये प्राचार्य म्हणून काम करतात.
दिव्यानी यांनी वर्ष 2019 मध्ये MISS RCERT विजेता, MISS VIDARBHA च्या अंतिम फेरीत धडक, त्यानंतर 2022 मध्ये Forever Fiesta द्वारा आयोजित the real super woman ची स्पर्धा जिंकली आहे.
यासोबतच lokmat sakhi manch द्वारे आयोजित श्रावण राणी स्पर्धा दिव्यानी यांनी जिंकली आहे.
महाविद्यालयीन आयुष्यात दिव्यानी यांनी अनेक सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आहे, लग्नांन्तर त्यांनी आपला छंद जोपासत आता mrs. India one in a million स्पर्धेत त्यांनी भाग घेतला इतकेच नव्हे देशातील 35 स्पर्धकांमधून त्यांनी थेट अंतिम फेरीत धडक मारली. www.mrsindiamillion.com
20 ते 24 डिसेंम्बर ला दिल्ली मध्ये mrs. india 2022 स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. Grand finale
चंद्रपूर सारख्या मागासलेल्या जिल्ह्यातून थेट राष्ट्रीय पातळीवर दिव्यानी यांनी धडक मारत संपूर्ण राज्याचे ते प्लॅटिनम वर्गातून स्पर्धेत प्रतिनिधित्व करीत आहे.
दिव्यानी यांनी सौंदर्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. स्पर्धा जिंकल्यावर त्यांनी mrs.universe स्पर्धेत भाग घेणार असल्याची प्रतिक्रिया दिली.
