News34 chandrapur
चंद्रपूर - पवनी जिल्हा भंडारा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी रीना यादवराव जनबंधु यांची बदली चंद्रपूर जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक पदी करण्यात आली आहे.
Police transfer
Police transfer
मागील वर्षभरापासून चंद्रपूर जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक पद हे रिक्त होते, आज गृह विभागाने 23 पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नतीने पद स्थापनेचे आदेश जारी केले आहे.
रीना जनबंधु या पवनी जिल्हा भंडारा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर कार्यरत होत्या, जनबंधु यांची पदोन्नती झाल्याने त्या लवकर चंद्रपूर जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक पदाचा पदभार सांभाळणार आहे. Chandrapur police
पहिल्यांदाच चंद्रपूर पोलीस विभागात महिला राज येणार असून गृह अधीक्षक, आता अप्पर पोलीस अधीक्षक व शहर व जिल्ह्यात सहायक पोलिस निरीक्षक पदावर अनेक कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी रुजू झाल्या आहेत.
रीना जनबंधु याआधी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर कार्यरत होत्या.