News34 chandrapur
चंद्रपूर - दिनांक १९/१२/२०१२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ औरंगाबाद येथील कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत अवमान करणारे विधान करून जगभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहे.
Govorner bhagatsing koshyari
महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी राज्यांची राज्यपाल या घटनात्मक पदाची धुरा सांभाळत असलेले भगतसिंग कोश्यारी यानी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीमाई फुले यांचा अपमान करणारी विधाने केली आहेत. भगतसिंग कोश्यारी हे विकृत बुद्धीने वारंवार महापुरुषांचा अवमान करत आहे. त्यामूळे त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही नैतीक अधिकार नाही.
Chatrapati shivaji maharaj
चार दिवसांपूर्वी वि. दा. सावरकरांचा अपमान झाला. म्हणून मंत्रीमंडळ बैठकीत निषेध करणारे शिंदे-फडणवीस सरकार महाराजाच्या अवमानाबद्दल मात्र गप्प आहे. याचा अर्थ या सरकारसाठी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीमाई फुले हे महापुरूष नाहीत का ?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी तात्काळ विशेष अधिवेशन बोलावून राज्यपालांना पदावरून हटविण्याबाबतचा आग्रही ठराव मांडावा, तसेच पुढील मंत्रीमंडळ बैठकीत निषेध व्यक्त करावा. अन्यथा संभाजी ब्रिगेड प्रतिरूप मंत्रीमंडळ बैठक आयोजित करून निषेध व्यक्त करेल व महाराष्ट्रात जन-आंदोलन उभे करेल.
या निषेध आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रा डॉ दिलीप चौधरी, महानगर अध्यक्ष विनोद थेरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी ऍड. गजानन नागपुरे, ॲड मनीष काळे, योगेश कुळमेथे, मोरेश्वर चटप यांच्यासह दिलीप होरे, महादेव ढुमने, अरुण धानोरकर, सुधाकर खरवडे , अनंता आत्राम साहेब, संतोष कुचनकार, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष वनिता आसुटकर, लताताई होरे, पल्लवी थेरे अर्चना चौधरी, प्रीतमाताई परकारे, सुचिता बोरकर, जया काकडे, आत्राम ताई, सारिका कुचनकर, संजय बोटरे, दिलीप गुळधे यांच्यासह संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड चे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.