News34 chandrapur
चंद्रपूर - सतत बेताल वक्तव्य करून राज्यातील वातावरण खराब करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी यासाठी राज्यात त्यांच्याविरोधात निदर्शने सुरू आहे. Bhagatsing koshyari governor
राज्यपाल कोशारी यांचा निषेध जिल्हा शिवसेनेने त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून केला, सतत महापुरुष यांच्याविरुद्ध अपमानकारक वक्तव्य करीत असतात मात्र त्यांच्याविरुद्ध कारवाई होत नाही.
Shivsena chandrapur
19 नोव्हेंम्बरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर येथिल कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंग कोषयारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे निषेधार्थ आहे.
या आधी सुद्धा राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्री बाई फुले यांचा अपमान केलेला आहे. शिवसेना चंद्रपूर शहर तर्फे शिवसेना जन संपर्क कार्यालय रामनगर चंद्रपूर येथे राज्यपाल यांच्या पुतळ्याला जोडे चप्पल मारून निषेध व्यक्त करत राज्यपाल यांना त्वरित पदावरून निवृत्त करण्यात यावे हि मागणी केली.
या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शालिक फाले, शिवसेना माजी महीला आघाडी जिल्हा संघटीका कुसूम ताई उदार, शिवसेना शहर प्रमुख सुरेश पचारे, युवासेना जिल्हा समन्वयक विक्रांत सहारे, तालुका प्रमुख संतोष नरुले, युवासेना उपजिल्हा प्रमुख सुमित अग्रवाल, अशोक चीलखरे, कल्पना तेलतुंबडे, युवती सेना उप जिल्हाधिकारी रोहिणी वैरागडे, धनश्री हेडाऊ, काजल बुटले, संतुष्टी बुटले, शिवा वझरकर, रिझवान पठाण, आशिष वानखेडे, नितीश तुरीले, हरीश मात्रे, बाडू भगत, शालीक फाले आदींची उपस्थिती होती.