News34 chandrapur
चंद्रपूर - 24 ऑक्टोम्बरला कोरपना येथील एका गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाचा गळा नाळ मध्ये अटकल्याने त्या महिलेला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या महिलेची प्रसूती करण्यात आली नाही, 25 ऑक्टोम्बरला सदर महिलेची प्रसूती झाली मात्र त्यामध्ये निष्पाप बाळाचा मृत्यू झाला होता.
डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे सदर मृत्यू झाला असा आरोप पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी लावला होता.
त्यानंतर सदर बाब AIMIM पदाधिकाऱ्यांना कळल्यावर ते तात्काळ जिल्हा रुग्णालयात पोहचले, त्यांनी डॉक्टरांना याबाबत जाब विचारला असता त्यावेळी उपस्थित डॉ. नैताम यांनी सदर प्रकरणी तात्काळ कमिटी गठीत करून निष्पक्ष चौकशी करण्याचे आश्वासन दिले. सदर प्रकरणी बाळाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला यासाठी त्या बाळाचे शवविच्छेदन करण्यात आले मात्र आजपर्यंत त्याबाबत अहवाल आला नाही.
घटनेला लोटून 15 दिवस झाले मात्र कमिटी गठीत झालीच नाही, AIMIM पदाधिकारी वारंवार जिल्हा रुग्णालयात जात चौकशी करीत होते मात्र त्यांच्या हाती केवळ निराशा येत होती.
त्यानंतर AIMIM चे पदाधिकारी यांनी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. नितनवरे यांना जाब विचारत त्यांचा घेराव करण्यात आला मात्र त्यांनी सदर प्रकरणी निव्वळ टोलवाटोलवी केली असा आरोप जिल्हाध्यक्ष नाहीद हुसेन यांनी लावला.
त्या निष्पाप मुलाला न्याय देतपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, आम्ही शासकीय रुग्णालय विरोधात आंदोलन उभारून त्या निष्पाप बाळाला न्याय देण्याचे काम करू असा इशारा AIMIM च्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी शहर अध्यक्ष अजहर शेख, शाहिद शेख, साजिद अशर्फी, आतिफ कुरेशी यांची उपस्थिती होती.
