News34 chandrapur
चंद्रपूर - बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर पादचारी पुलाचा भाग कोसळल्याने अनेक प्रवासी जखमी तर एका महिलेचा मृत्यू झाला होता. Ballarpur over bridge collapsed
या दुर्घटनेत आता महत्वाची माहिती आली असून रेल्वे विभागाने 2 अधिकाऱ्यांना या प्रकरणी दोषी ठरवीत निलंबित केले आहे.
रेल्वे विभागाने इन्स्पेक्टर ऑफ वर्क (आयओडब्ल्यू) जी. जी. राजुरकर व याच पदावरील तत्कालीन अधिकारी विनयकुमार श्रीवास्तव या दोघांना निलंबित केले आहे.
काही महिन्यांपूर्वी सदर पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले होते, मात्र त्यामध्ये अनेक त्रुट्या आढळल्या होत्या, कारण त्यावेळी सदर पुलाचे काही लोखंडी भाग कुजलेले होते. Ballarpur railway junction
त्रुट्या असून सुद्धा ऑडिट मध्ये याबाबत काही उल्लेख नव्हता, त्यामुळे सदर दुर्घटना घडला असल्याचा ठपका रेल्वे विभागाने दोन्ही अधिकाऱ्यांवर ठेवला.
या दुर्घटनेत शिक्षिका नीलिमा रंगारी यांचा मृत्यू झाला होता, अनेक प्रवासी जखमी झाले. Breaking news
आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीमधून एकूण 16 लाख 50 हजार रुपयांची मदत केली आहे.
सध्या सदर पादचारी पुलाचे दुरुस्तीकरणाचे काम युद्ध स्तरावर होत आहे.
