News34 chandrapur
चंद्रपूर - विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेम्भूर्डे यांनी कांग्रेसचे खासदार नेते राहुल गांधी यांना चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांच्या विरोधात लेटरबॉम्ब टाकला.
टेम्भूर्डे यांच्या पत्रात धानोरकर यांचे अवैध धंदे व त्यांनी दारूबंदी व त्यानंतर च्या काळात गेलेल्या सर्व कृत्याची माहिती देत त्यांना पुढील लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी त्या पत्रात केली आहे.
टेम्भूर्डे यांच्या आरोपावर खासदार धानोरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
टेंभुर्डे हे राजकीय बेरोजगार माणूस आहे.या माणसाचं शाळेच जाळ आहे. याने अनेक शिक्षकांना बेरोजगार केले आहे. निवडणूक आल की हा व्यक्ती सक्रिय होतो. निवडणुकीतून पैसे कमविणे याचं साधणं आहे. माझ्या विरोधात याच्या मुलांन निवडणूक लढली. तो हरला. मी त्यावेळेस आमदार झालो होतो. जिल्ह्यात अस्तित्व नसणारा हा माणूस आहे. दारू हा माझा व्यवसाय आहे. अनेक वर्षापासून सुरू आहे.हा व्यवसाय अधिकृत आहे. लोकसभा निवडणुकीत या व्यक्तीने अनेकदा पैशाची मागणी केली. माझ्या पत्नीकडून याने पैसे घेतलेले आहे. आताही लहान मोठे आंदोलन असले. राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते येणार असले, की हा पैशाची मागणी माझ्याकडे करीत असतो.
