News34 chandrapur
पुणे - मराठी व हिंदी चित्रपट क्षेत्रातील दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांचं वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्या निधनावर अनेक कलाकारांनी समाजमाध्यमांद्वारे श्रद्धांजली वाहिली. Movie actor vikram gokhale
Vikram gokhale passed away
Vikram gokhale passed away
मागील 15 दिवसापासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते.
उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. Veteran actor
गोखले यांना मागील काही दिवसांपासून अति मधुमेहाचा त्रास होता, त्यामुळे त्यांच्या शरीरात पाणी झाले होते.
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व नाट्यमंदिर येथे ठेवण्यात येणार आहे. तर, सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर वैकुंठधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
विक्रम गोखले यांचा प्रवास
विक्रम गोखले यांनी हिंदी-मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने एक खास चाहता वर्ग निर्माण केला हेता. त्यांच्या आवाजातील कठोरपणा ही त्यांच्या अभिनयाची एक खासियत होती. विक्रम गोखले यांच्या डोळ्यांतून त्यांचा अभिनय आणि व्यक्तीरेखा व्यक्त व्हायच्या. त्यांचा अभिनय करताना डोळे किती बोलके असायला हवे, याचा मोठा अभ्यास त्यांना होता. विक्रम गोखले यांनी मराठी-हिंदी चित्रपटात अभिनय केला आहे.
विविध मालिका, नाटक यातही काम केलं आहे. नटसम्राट, थोडं तुझं थोडं माझं, कळत नकळत, दुसरी गोष्ट, अनुमती, मी शिवाजी पार्क, आघात या सुखानों या, एबी आणि सीडी हे मराठी चित्रपट त्यांचे खूप गाजले. तर इंसाफ, अग्निपथ, खुदा गवाह, अधर्म, स्वर्ग नरक या हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. अलिकडच्या काही दिवसात त्यांनी वेबसिरीजमधूनही अभिनय केला. सिंहासन, मेरा नाम करेगी रोशन, उडान, क्षितिज ये संजीवनी, जीवन साथी या वेबसिरीज खूप गाजल्या.
