News34 chandrapur
चंद्रपूर - सामाजिक बांधिलकी फाउंडेशन उर्जानगर तर्फे संविधान निर्माते महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला दि. 26 नोव्हेबर 1949 साली बहाल केलेल्या संविधानातील हक्क, अधिकार व कर्तव्य यांची विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी तसेच संविधानाप्रती विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता यावी, constitution day india
या समतावादी व उदात्त हेतूने उर्जानगर सामाजिक बांधिलकी फाऊंडेशन ग्रुपच्या वतीने दि. 26 नोव्हेबर 2022 रोज शनिवार ला सकाळी 10.00 संविधान दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक शाळा जटपुरा गेट येथे सर्व बाल विध्यार्थी यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले.

तसेच शाळेच्या मुख्याध्यापीका आंबटकर मॅडम यांना भारताचे संविधान भेट देण्यात आले, यावेळी सामाजिक बांधिलकी फाउंडेशनचे अध्यक्ष संजय घनचेकर साहेब, सचिव राहुल बेले, कोषाध्यक्ष पंकज दवाले, सल्लागार देवानंद धानोरकर साहेब व शुभम राऊत उपस्थित होते.