News34 chandrapur
चंद्रपूर - ऑक्टोबर महिन्यात आम आदमी पक्षाने सरकारी दवाखाण्यासमोरील श्री जी मेडिकल मध्ये 60 रुपयांची कटर ब्लेड 600 रुपयांना विकण्याची बाब उघडकीस आणत कारवाई करायला लावली होती. Extortion
5 नोव्हेंम्बरला आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते रहमान खान पठाण यांनी पक्षातील युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांची भेट घेत एका पत्रकाराने आपण मेडिकल मालकाकडून 2 लाख रुपये घेतले असा पुरावा जवळ आहे असे सांगितले. Chandrapur crime news
त्याबाबत बातमी पेपरमध्ये न लावण्यासाठी भेट घ्यायची आहे असे सांगितले, आप च्या कार्यकर्त्याने इम्रान बाऊन्सर शेख व अशोक कुंड रा. भिवापूर वार्ड यांची प्रत्यक्ष भेट राईकवार यांच्यासोबत करून दिली.
आरोपींनी मयूर राईकवार यांना बातमी न लावण्यासाठी 30 हजार रुपयांची मागणी केली, जर पैसे दिले नाही तर तुमचं सर्व राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल तुम्ही समाजात तोंड दाखविण्याच्या लायकीचे असणार नाही असे सांगितले. Aap chandrapur
तडजोडीअंती 5 हजार रुपये देण्याचे ठरले, या सर्व प्रकरणाबाबत मयूर राईकवार यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली.
रामनगर पोलिसांनी सापळा रचत आरोपी 38 वर्षीय अशोक कुंड रा. भिवापूर वार्ड व 21 वर्षीय इम्रान उर्फ बाऊन्सर शेख रा. पठाणपूरा गेट यांना रंगेहात अटक करण्यात आली.
इम्रान शेख (शहा) हे लोकमत वृत्तपत्राचे पत्रकार आहो असे सांगितले, मात्र प्रत्यक्षात ते पत्रकार नव्हते. आरोपिकडून 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मुळे, गुन्हे शोध पथकाचे सपोनि हर्षल एकरे व पोउपनी विनोद भुरले यांनी केली.
चंद्रपूर जिल्ह्यात असे बोगस प्रकार घडू नये यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने महत्वाची माहिती 9 नोव्हेंम्बरला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, अशी माहिती आप चे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी दिली आहे.
