News34 chandrapur
चंद्रपूर - वेगळ्या विदर्भाच्या नावावर भाजपने मतदान मागितले त्यानंतर भाजप सत्तेत आली मात्र विदर्भ काही वेगळा झाला नाही, कांग्रेस नेहमी वेगळ्या विदर्भाच्या पाठीशी आहे, वेगळ्या विदर्भासाठी खासदार म्हणून मी स्वतः प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया खासदार धानोरकर यांनी दिली. Separate vidarbha
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन सुरू आहे, याचाच एक भाग म्हणून माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वात खासदार धानोरकर यांनी वेगळ्या विदर्भासाठी राजीनामा द्यावा याबाबत धानोरकर यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यात आले.
मात्र खासदार धानोरकर यांनी आंदोलकांचे पुष्पगुच्छ देत स्वागत करून गांधीगिरी केली.
व आम्ही वेगळ्या विदर्भासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही आंदोलकांना दिली. Gandhigiri
भाजपने अनेकदा वेगळ्या विदर्भ करू याचा फक्त देखावा केला, मात्र सत्तेत आल्यावर विदर्भ विसरून गेले आता सत्ताधार्यांना विदर्भाचा विसर पडला आहे.
आज भाजप विरोधात आंदोलन करण्याची गरज आहे, त्यांचे सर्व आश्वासन फोल ठरले अशी प्रतिक्रिया खासदार धानोरकर यांनी दिली.
