News34 chandrapur
यवतमाळ - देशातील आधुनिक युगात मोबाईलने सर्वत्र थैमान घातले आहे, मोठ्या व्यक्तीपासून ते लहान मुलांना मोबाईल ने जणू वेड लावले आहे.
सध्या मोबाईलच्या वापरात अल्पवयीन मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून आली आहे. Mobile ban for teenagers
मोबाईल गेम, जुगार हे सर्व प्रतिबंधित गेम मोबाईल च्या माध्यमातून सर्रास सुरू आहे, मात्र विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यातील बांसी या गावात ग्रामसभेत अल्पवयीन मुलांना संपूर्ण मोबाईल बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. Mobile addiction
असा निर्णय घेणारी राज्यातील पहिली बांसी ग्रामपंचायत ठरली असून 11 नोव्हेंम्बरला सदर ठराव सर्वानुमते घेण्यात आला.
गावातील सर्वत्र विकास आणि नवनवीन प्रयोग हे बांसी ची ओळख पडली आहे, गावातील भावी तरुणाईला चांगले वळण लावण्याचा ग्रामपंचायत चा हा निर्णय कितपत यशस्वी ठरेल हे येणारी वेळ सांगेल.