Political update
भाजपा प्रदेश कार्यालयात मा. प्रदेशाध्यक्षांनी चित्रा वाघ यांना नियुक्ती पत्र प्रदान केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी नाईक, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील व मावळत्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. उमा खापरे उपस्थित होते.
Bjp mahila morcha
चंद्रशेखर बावनकुळे यांनी चित्रा वाघ यांना नव्या नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, मा. चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा महिला मोर्चा संघटनात्मकदृष्ट्या अधिक बळकट होईल तसेच विविध पक्षांमधील महिला कार्यकर्त्या भाजपाशी जोडल्या जातील, अशी अपेक्षा आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिलांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. ते राज्यातील महिलापर्यंत पोहचविण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करण्यावर आपण भर देऊ.