News34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झालेली होती.
शहरातील श्रीराम वार्ड, भानापेठ येथील 24 वर्षीय दिनेश रामटेके यांनी बिल्डिंग च्या पार्किंग मध्ये ठेवलेली बुलेट मोटारसायकल MH34AU6725 चोरीला गेली, याबाबत रामटेके यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली, त्याचप्रमाणे पठाणपूरा येथील 41 वर्षीय अमित कामळे यांनी डॉ. सैनानी यांच्या रुग्णालयाबाहेर ठेवली असता रात्री 9 वाजताच्या सुमारास अज्ञातांनी वाहन चोरी केले, पल्सर वाहन क्रमांक MH34BW1353 चोरीची तक्रार शहर पोलीस स्टेशनमध्ये कामळे यांनी दिली, तिसऱ्या घटनेत भानापेठ येथील 19 वर्षीय मनोहर सिंग राठोड यांचे बजाज पल्सर वाहन क्रमांक MH34BM4354 घरासमोर ठेवले असता ते चोरी झाले. Chandrapur crime
तीन दुचाकी चोरीच्या तक्रारी पोलीसात दिल्यावर पोलिसांनी मुखबिर यांच्या माहितीवरून पोलिसांच्या रेकॉर्डवरील 3 आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले, पोलिसी खाक्या दाखविल्यावर तीन वाहन चोरी केली असल्याची कबुली दिली. Chandrapur police
आरोपी 24 वर्षीय कार्तिक राजू खंडाळे, 38 वर्षीय कुणाल यशवंत गरगेलवार व 43 वर्षीय चंद्रकांत उर्फ पप्पू मेजर वामनराव मानमोडे तिघेही राहणार विठ्ठल मंदिर वार्ड यांचा समावेश आहे.
आरोपिकडून चोरी गेलेले वाहन असा एकूण 2 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वाहन चोरी करणाऱ्या या टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे जयप्रकाश निर्मल, महेंद्र बेसरकर, विलास निकोडे, जयंता चुनारकर, सचिन बोरकर, इम्रान खान, चेतन गज्जलवार, दिलीप कुसराम, इर्शाद खान, रुपेश रणदिवे यांनी अटक केली.
